भाजप, मोदी आणि विकीलीक्स

भाजपने विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा फोटो असलेल्या पोस्टरची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.

Updated: Mar 18, 2014, 08:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपने विकीलीक्सचे संस्थापक ज्युलियन असांज यांचा फोटो असलेल्या पोस्टरची चौकशी करण्याची तयारी दर्शवली आहे.
विकीलीक्सने सोमवारी सांगितलं होतं की, भारतीय जनता पार्टीने असांजला भेटण्याची बातमी फंड जमा करण्यासाठी पसरवलेली अफवा आहे.
या सोबत विकिलीक्सने हे ही स्पष्ट केलं आहे की, अमेरिकेच्या कोणत्याही अधिकाऱ्याने नरेंद्र मोदी यांना `अनकरप्टेबल` म्हणजेच भ्रष्टाचार न करणारा व्यक्ती म्हटलेलं नाही.
विकीलीक्सच्या स्पष्टीकरणानंतर भाजपाचे राष्ट्रीय सचिव चौरसिया यांनी म्हटलं आहे, जर विकीलीक्स पुरावे देत असेल, तर आम्ही देणगी मागण्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यास तयार आहोत.
विकीलीक्सचं स्पष्टीकरण
विकीलीक्सने सोमवारी ट्विटरच्या माध्यमातून भाजपा समर्थकांद्वारे सोशल मीडियावर, प्रसारीत करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टर बाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
विकीलीक्सने असंही म्हटलं आहे की, ही अफवा ट्वीटरवर भाजपाच्या प्रिती गांधी यांनी पसरवली आहे. तसेच आपल्या कोणत्याही केबलमध्ये विकिलीक्सने नरेंद्र मोदी यांना अनकरप्टेबल म्हटलेलं नाही.
२०११ मध्ये अमेरिकेच्या कुटनीतीवर आलेल्या केबलशी संबंधित हे प्रकरण आहे.
विकिलीक्सने म्हटलं आहे की, विकिलीक्सने एवढंच म्हटलं आहे, भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लोकप्रिय आहेत, त्यांना भारतीय भ्रष्टाचार मुक्त समजतात.
विकीलीक्सने दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसचे नेते मनोहर सिंह जडेजा यांनी मोदींना भ्रष्टाचार मुक्त म्हटलं होतं. तसेच मोदी लोकप्रिय नेते आहेत, आणि काही प्रमाणात भारतीय मुसलमान त्यांना समर्थन देतांना दिसत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.