नाशकात मनसेचा नमो नमोचा जप, मनसेच्या पत्रकांमध्ये मोदी!

भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून मनसेनं सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.

| Updated: Apr 14, 2014, 09:38 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचा फोटो छापून मनसेनं सुरू केलेल्या पत्रकबाजीवर शिवसेनेनं आक्षेप घेतलाय. भाजपच्या पदाधिकार्‍यांनी तत्काळ आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी शिवसेनेनं केलीय.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह यांनी कान टोचल्यानंतरही मनसेने नमो नमोचा जप सुरुच ठेवलाय. गुजराती मतदारांना आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी गुजराती भाषेत प्रचार पत्रक प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यावर नरेंद्र मोदी यांचा फोटो छापण्यात आल्यानं शिवसेनेच्या गोटात संतापाचं वातावरण आहे.
शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या पारंपरिक गुजराती मतदाराना आकर्षित करण्यासाठी मनसेनं डाव रचला असून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप शिवसेना करतेय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.