पैसेवाटपावरून मनसेचा राडा

Last Updated: Thursday, February 16, 2012 - 17:32

www.24taas.com, नाशिक

 

नाशिकमधील पंचवटीच्या प्रभाग क्र. १४ मध्ये मतदानाला गालबोट लावणारी घटना घडली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मतदारांना  पैसे वाटत असल्याच्या संशयावरून मनसैनिकांनी त्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली आहे.

 

नाशिकमधील प्रभाग क्र. १४ मध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार संजय टिळे यांना मनसैनिकांनी मारहाण केली असून घराची आणि कार्यालयाचीही तोडफोड केल्याचा आरोप टिळे यांच्या समर्थकांनी केला आहे.  तर,  मतदानाच्यावेळी  टिळे मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून त्यांचे प्रतिस्पर्धी असणाऱ्या मनसे उमेदवार राहूल ढिकले यांनी टिळे यांच्या घराची  तसेच  कार्यालयाची तोडफोड केल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. राहूल ढिकले हे मनसे आमदार उत्तमराव ढिकले यांचं पुत्र आहेत. संजय टिळे मतदारांना पैसे वाटत असल्याचा आरोप राहूल ढिकले यांनी केला आहे.

 

मात्र, या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पंचवटी चौकातील मालविय चौकात ही घटना घडली आहे.

[jwplayer mediaid="49149"]

First Published: Thursday, February 16, 2012 - 17:32
comments powered by Disqus