राज ठाकरेंचे भुजबळांच्या संपत्तीवर बोट, सेनेवर तोफ

महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 19, 2014, 10:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
महात्मा फुल्यांच्या नावाने संघटना चालवायची. त्यांच्या नावावर समतेचे राजकारण केल्याचे दाखवायचे. मात्र, संस्थांना फुलेंएेवजी आपली नावे द्यायचे हे यांचे उद्योग. छगन भुजबळ कुटुंबीयांची कोट्यवधींची संपत्ती वाढतेच कशी? याबाबत त्यांने कोठे किती संपत्ती आहे, याचा दाखला देत भुजबळांना टार्गेट केले. तर शिवसेनेला नाव न घेता जोरदार चिमटे काढले. त्याचवेळी मतदार याद्यांमध्ये घोळ करून काँग्रेसने अनेकांना मतदानापासून वंचित ठेवलेय, राज म्हणालेत.
मनसेचे नाशिक लोकसभेतील उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत राज ठाकरे यांनी भुजबळांची संपत्ती आणि भ्रष्टाचाराचा पाढा वाचला. यावेळी मला कोण्याच्या मदतीची गरज नाही. नरेंद्र मोदी विकास करतील, हे मला वाटले म्हणून मी त्यांना आधीच पाठिंबा दिलाय. मला विकासाचे राजकारण करायचे आहे. कोणीही काही म्हणो, मला काहीही फरक पडत नाही, असे राज यांनी सांगून शिवसेनेचे नाव न घेता त्यांच्यावर मोदींच्या सलाइनवर असल्याची टीका केली. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी मनसेच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जाहीर सभेत केले. महाराष्ट्रातील रोजगार येथील स्थानिक तरुणांनाच मिळाले पाहिजे, त्यासाठी मनसेचे खासदार दिल्लीत प्रयत्न करतील, असे ते म्हणालेत.
मोदींच्या पंतप्रधानपदाला शिवसेनेचा विरोध होता, आता तेच मोदींच्या सलाईनवर आहेत, असा आरोप त्यांनी केला. भुजबळांनी शिवसेना फोडली. बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांना घरी जेवायचे आमंत्रण दिले गेले. ज्या व्यक्तीने बाळासाहेबांचा `टी बाळू` असा जाहीर उल्लेख करुन अपमान केला त्यांना सन्मानाने मातोश्रीवर बोलावले जाते, असे सांगत उद्धव यांचे नाव न घेता राज यांनी त्यांच्यावर तोफ डागली.

नाशिकचा विकास पाच वर्षात झाला नाही तर मला सांगा. मी विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी गोदापार्कसारखा प्रकल्प हाती घेतला. यांनी (शिवसेना) पालिकेवर कर्ज करून ठेवलंय. त्यामुळे हा प्रकल्प करण्यासाठी खासगी मदत घ्यावी लागली. आंब्याचे झाड लावले की दुसऱ्या दिवशी फळ येत नाही, असा दाखला देत पाच वर्षांनंतर मला सांगा येथे विकास झाला की नाही तो. हेमंत गोडसे. हा केवळ आपल्या स्वत:च्या फायद्यासाठी बघतो. तो तिथेही टीकणार नाही (शिवसेना). याला खासदारकीला उभा केला. आमदारकीला केला. त्यावर न थांबता नगरसवेक केला. निवडणून आल्यानंतर मला महापौर करा, असे सांगतो. यालाच सर्व द्यायचे. परंतु मला कधी तो काम करताना दिसला नाही, मग याला कशी उमेदवारी देणार, असा समाचार गोडसे यांचा घेतला.

पाहा व्हिडिओ

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.