कोकणात राणेंविरोधात सर्व विरोधक - संजय राऊत

कोकणातील लोकसभेची निवडणूक नीलेश राणे विरुद्ध सर्व विरोधक अशी आहे. ही निवडणूक शिवसेना जिंकेल कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळेल, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Apr 8, 2014, 09:17 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग
कोकणातील लोकसभेची निवडणूक नीलेश राणे विरुद्ध सर्व विरोधक अशी आहे. ही निवडणूक शिवसेना जिंकेल कोकणात पुन्हा एकदा शिवसेनेचा झंझावात पाहायला मिळेल, असा आशावाद शिवसेना नेते संजय राऊत यांनी सिंधुदुर्गात व्यक्त केलाय.
कोकणातील विनायक राऊत आणि नीलेश राणे यांच्यातील सामन्यात अतिशय रंगत निर्माण झालीय शिवसेनेची फौज येथे मैदानत उतरलीय आहे. तर कोकणात धुळवड संपली तरी शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात सुरू झालेला राजकीय शिमगा संपायचं नाव घेत नाहीये.
शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांनी पार्ल्यातून निवडणूक लढवताना प्रतिज्ञापत्रात पत्नीचे नाव शामल तर मुलाचं नाव गीतेश असं दिलं होतं. मात्र आताच्या प्रतिज्ञापत्रात त्यांनी पत्नीचं नाव मेघा तर मुलीचं नाव रूची असं दिलंय. नितेश राणे यांनी विनायक राऊत यांच्या शिक्षणावरून प्रश्न उपस्थित केला होता आता राऊत यांच्या लग्नाबाबतच शंका उपस्थित केली जातेय.
दरम्यान, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेची परिस्थिती बिकट आहे, त्यांच्याकडे मुददे नाहीत, म्हणून ते वडा आणि सूपवर आलेत, अशी टीका पुण्यात केलीय. शिवसेनेला राज्यात 3 ते 4 जागा मिळतील, असा दावाही राणेंनी केलाय. त्याचबरोबर घरातलं भांडण घरातच ठेवावं, असा सल्लाही त्यांनी राज-उद्धवना दिलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.