ऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच!

जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय. 

Updated: Apr 13, 2015, 01:15 PM IST
ऑपरेशनद्वारे प्रसूती आई-बाळासाठी हानिकारकच! title=

जिनेवा : जगभरात महिलांच्या प्रसूती प्रसंगी ऑपरेशन करून अर्भकाला आईच्या पोटातून बाहेर काढण्याची प्रक्रिया सर्रास वापरली जाते. पण, याच प्रक्रियेवर जागतिक स्वास्थ संघटनेनं (डब्ल्यूएचओ) चिंता व्यक्त केलीय. 

ऑपरेशनची प्रक्रिया तेव्हाच वापरली जावी जेव्हा मेडिकलनुसार ती गरजेची असेल, असा सल्ला डब्ल्यूएचओनं दिलाय. ऑपरेशन करून अर्भकाला जन्म देताना त्याचा वाईट परिणाम आईच्या आणि बाळाच्या प्रकृतीवर होत असल्याचं डब्ल्यूएचओनं स्पष्ट केलंय. 

डब्ल्यूएचओमध्ये रिप्रोडक्टिव्ह हेल्थ अॅन्ड रिसर्चच्या संचालक मेर्लिन टिमरमॅन यांच्या म्हणण्यानुसार, अनेक विकसनशील तसंच विकसीत देशांमध्ये ऑपरेशन करून महिलांची प्रसूती केली जाते. जिथे ऑपरेशनची गरज नसेल अशाही प्रकरणांत ही प्रक्रिया वापरली जाते. हा प्रसूतीचा एक सुरक्षित मार्ग आहे पण, त्याचा नकारात्मक आणि नुकसानकारक परिणाम आई आणि मुलावर होऊ शकतो.

या प्रक्रियेचे नकारात्मक परिणामही होतो. रक्तस्राव आणि इतर जोखीम वाढू शकते. विकसनशील देशांतही प्रसूतीदरम्यान आईचा ऑपरेशन टेबलवरच मृत्यू होतो... त्यामागचंही अनेकदा कारण ऑपरेशनच असतं. ब्राझील, साइप्रस आणि जॉर्जिया यांसारख्या काही मध्यम विकसीत देशांतही ऑपरेशनच्या माध्यमातून प्रसूतीची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.