दात कसे कराल मजबुत, काय खावे?

आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
आपले दात चांगले तर आपले आरोग्य चांगले. आपण आपल्या दातांची काळजी कशी घ्यावी आणि दात मजबुत करण्यासाठी काय उपाय योजावेत याबाबत आपल्याला काही माहिती आहे का? नसेल तर करून घ्या.
डॉक्टरकडे न जाता बहुतेकदा दाताची दुखणी अंगावरच काढली जातात. अगदीच नाइलाज झाला म्हणजे डेंटिस्टकडे जाणे होते. दातांचे दुखणे नको आणि त्यावर औषधोपचार तर नकोच नको, असे वाटत असेल, तर मुळात हे दुखणेच येऊ नये यासाठी काय करायचे. त्यावर उत्तर म्हणजे विवधि फळे, भाज्या आणि कडधान्य खायची.
दातांची काळजी कोण घेतं?
# दात स्वच्छ आणि मजबूत राहावेत यासाठी स्ट्रॉबेरी हे एक अत्यंत उपुयक्त फळ आहे. स्ट्रॉबेरीमध्ये असे अनेक गुणधर्म आणि वैशिष्टये आहेत, जे दात स्वच्छकरून त्यांना ब्लीच करण्यास मदत करतात. चहा आणि कॉफीमुळे दातांवर पडलेले डाग स्ट्रॉबेरीमुळे स्वच्छ होतात. जेवणानंतर नियमितपणे थोडीफार स्ट्रॉबेरी खायला हवी. स्ट्रॉबेरीमधील आम्ल दातांना नैसर्गिकरीत्या उजळपणा आणते.
# कोबी खाताना त्याचे दातांना घर्षण होते. त्यामुळे दात उजळण्यास मदत होते. कोबी हा नैसर्गिक टूथब्रश आहे. कोबी खाताना तोंडात लाळ तयार होते. ती दातांवर जमलेले सूक्ष्मकणही दूर करते.
# कलिंगडाचे दोन काप दररोज खाल्ल्याने शरीरास जितकी `क` जीवनसत्वाची गरज असते, त्यातील २५ टक्के आणि जीवनसत्व यातून मिळते. हे जीवनसत्व दात आणि हिरड्या यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. लोह अधिक प्रमाणात शोषूण घेण्याची क्षमता त्याचबरोबर शरीरातील घातक रसायनांचाही ते सामना करू शकते.

# संत्रीही नियमितपणे आहारात घेतली पाहिजेत. संत्र हे `क` जीवनसत्वाचे उत्तम स्त्रोत आहे. त्यामुळे दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य उत्तम राहते. लोह अधिक प्रमाणात शोषले जाते. तसेच `क` जीवनसत्त्वाचे पदार्थ चघळल्यामुळे दातांचा नाश किंवा र्‍हास रोखला जाऊ शकतो.
# दररोज एक सफरचंद खाल्ल्यास डॉक्टरांना स्वत:पासून दूर ठेवणं शक्य होऊ शकते. सफरचंदामुळे दातांचे आयुष्यमान वाढते. सफरचंदाचा रस पिण्यापेक्षा ते चावून खाल्ल्यास दातांचे आणि हिरड्यांचे आरोग्य सुधारते. सफरचंद खाल्ल्यामुळे दात स्वच्छ आणि बळकट होतात.
# द्राक्षांमध्ये असलेले मॅलिक अॅसिड उत्प्रेरकांसारखे कार्य करते. त्यामुळे दात पांढरे शुभ्र होतात. दातांवरील डाग कमी होतात. जेवणानंतर पाणी प्यायल्यामुळे किंवा चूळ भरल्यामुळे दातांत अडकलेले कण निघून जाण्यास मदत होते.
# हिरव्या भाज्या खाल्ल्यामुळे शरीरास रास बेटा केरोटिन मोठ्या प्रमाणावर मिळते. त्यामुळे मिळालेले `अ` जीवनसत्व आपल्या शरीराला आणि दातांना बळकटी आणते. ताज्या हिरव्या द्विदल कडधान्यांचे दातांवर घर्षण होऊन दात स्वच्छ होतात. तसेच तोंडात लाळ तयार होते. त्यामुळे आरोग्यदायी सुखी आणि आनंदी जीवन जगू शकता.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.