रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश

तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि  सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

Updated: Jun 12, 2015, 03:20 PM IST
रात्री जागत असाल तर कमी खा, राहा फ्रेश title=

न्यूयॉर्क : तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागत असाल तर तुम्हाला तोंडावर लगाम लावावा लागेल. कमी खाण्यामुळे तुम्ही सकाळी फ्रेश राहता. कमी खाल्याने अपुऱ्या झोपेमुळे निर्माण होणारे नकारात्मक विचार कमी होतात, असं एका संशोधनातून समोर आले आहे. रात्री कमी खाल्याने आपल्या एकाग्रतेत आणि  सतर्कतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो.

रात्रीच्यावेळी जागणारे लोक सुमारे ५०० कॅलरीज खर्च करतात. रात्री जागूनही खाण्यापासून दूर राहणारे लोक मानसिक ताणावासारख्या समस्यापासून दूर राहू शकतात, असं संशोधनातून समोर आले आहे, असं पेन्सिलवेनिया विद्यापीठातील वरिष्ठ लेखक डेविड डिंगेज यांनी म्हटलंय.

संशोधनासाठी २१ ते ५०  वयोगटातील ४४ लोकांचा अभ्यास केलाय. त्यांना दिवसभरात भरपूर खायला दिले तसेच पाणी पिण्यास देण्यात आले. यासोबत त्यांना तीन रात्री फक्त चार तास झोपू दिले गेले.

चौथ्या रात्री २०  लोकांना खाणं आणि पाणी देण सुरुच ठेवले तर उरलेल्या लोकांना रात्री १० नंतर केवळ पाणी पीण्याची परवानगी देण्यात आली. सोबतच या सर्वांना पहाटे ४ वाजता झोपण्याची परवानगी देण्यात आली.

उपाशी राहिलेले सहभागी लोक जास्त ताजेतवाने दिसून आले. सोबतच जे लोक रात्रभर खातपीत होते त्यांच्या एकाग्रतेवर नकारात्मक प्रभाव पडला, असे संशोधनातून समोर आले.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.