सावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक

दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.

Updated: Aug 24, 2015, 04:59 PM IST
सावधान! आता अवघ्या विशीतही होतो हार्ट अॅटॅक title=

नवी दिल्ली: दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करणाऱ्या 22 वर्षीय निशांतची (बदललेलं नाव) जीवनशैली त्याच्या वयातील इतर मुलांसारखीच धावपळीची होती. तो फक्त चार तास झोपायचा, जेवणात अधिक कोलेस्ट्रॉलचं आणि ट्रांस फॅटचं प्रमाण असलेलं जंक फूड, तणावमुक्त राहण्यासाठी दारू आणि सिगारेटचं वापर.

एक दिवस काम करतांना त्याला अस्वस्थ वाटलं आणि काही समजायच्या आतच तो बेशुद्ध पडला. त्याच्या सहकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा कळलं की, त्याला हार्ट अॅटॅक आलाय. सुरुवातीला केलेल्या इंजिओप्लास्टीनंतर कळलं त्याची डाव्या बाजूची इंटीरि्अर डिसेंडिंग आर्टरी पूर्णपणे ब्लॉक झाल्यानं त्याला हृदयविकाराचा झटका आला.

या घटनेनंतर अनेकांना विश्वासच बसत नव्हता की, अवघ्या 22 व्या वर्षी कुणाला हार्ट अॅटॅक येऊ शकतो. मात्र 21व्या शतकातील तरुणांना हा त्रास होतोय. याचं मुख्य कारण म्हणजे तरुण पिढीचं आपल्या जीवनशैलीकडे लक्ष नाही. ताणतणाव, दिवसभर टिव्ही, लॅपटॉप आणि आयपॅडवर जास्त वेळ त्यांच्या जातो. कमी झोप, जंक फूड खाणं आणि दारू, सिगारेटसारख्या वाईट सवयी. यामुळं लहान वयातच तरुणांना हार्ट अॅटॅक होतोय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.