थकवा दूर करण्यासाठी ५ सोपे उपाय

सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना थकवा जाणवतो. थकवा जाणवत असेल तर खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकता.

Updated: May 29, 2016, 10:31 PM IST
थकवा दूर करण्यासाठी ५ सोपे उपाय title=

मुंबई : सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना थकवा जाणवतो. थकवा जाणवत असेल तर खालील टीप्स तुम्हाला फायदेशीर ठरु शकता.

१. अपूर्ण झोप हे थकवा येण्यामागचं कारण असतं. त्यामुळे भरपूर झोप घ्या. जास्त झोपणे ही टाळा कारण यामुळे माणून आणखी आळशी बनतो. 

२. थकवा जाणवत असल्यास पाण्यात थोडंसं मीठ टाकून अंघोळ केल्याने रक्तपुरवठा सुरळीत होतो आणि आराम मिळतो.

३. थंड पाण्याने अंघोळ केल्यास फ्रेश वाटतं. त्यामुळे तुमचा थकवा दूर होतो. 

४. जेवणातून तुमच्या शरीराला ताकद मिळते त्यामुळे व्हिटॉमिन बी, मॅग्नेशियम, पोटेशियम आणि लोहयुक्त जेवण खाणे आवश्यक आहे. फळे आणि भाज्यांचे प्रमाण वाढवा.

५. व्यायाम हे अनेक गोष्टींवर मोठा उपाय आहे. व्यायाम केल्याने रक्तात एंड्राफिन्सचं प्रमाण वाढतं त्यामुळे मन प्रसन्न होतं. दीर्घ श्वास घ्या.