पुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...!

ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

Updated: Sep 3, 2015, 11:28 AM IST
पुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...! title=

वॉशिंग्टन : ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.

ज्या व्यक्ती रात्री सहा तास किंवा त्यापेक्षाही कमी वेळ झोप घेतात, त्यांना सर्दी होण्याचा धोका जास्त असतो, असं या अभ्यासात म्हटलं गेलंय. 'सिन्हुआ'नं दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन जर्नल स्लीपमध्ये प्रकाशित झालेल्या या शोधानुसार, चांगल्या स्वास्थ्यासाठी योग्य प्रमाणात झोप मिळणं अत्यावश्यक असल्याचा खुलासा करण्यात आलाय. 

सॅन फ्रान्सिस्कोच्या 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'मध्ये सहाय्यक प्रोफेसर एरिक प्रॅथर यांच्या म्हणण्यानुसार, पुरेशी झोप न मिळाल्यानं शारीरिक स्वास्थ्यावर वाईट परिणाम होतो. 

या अभ्यासासाठी १६४ व्यक्तींच्या स्वास्थ्यावर दोन महिन्यांपर्यंत लक्ष ठेवण्यात आलं. तसंच या व्यक्तींच्या तणाव, स्वभाव, अल्कोहोलचं सेवन आणि सिगारेटच्या सवयींवर लक्ष ठेवण्यात आलं... त्याचं आकलन करण्यात आलं. 

शोधकर्त्यांनी सहभागी झालेल्या व्यक्तींच्या झोपेच्या सवयीचा सात दिवस अभ्यास केला... आणि या सर्व व्यक्तींना सर्दीच्या वायरससोबत सामना करण्यात आला. 

यामध्ये, ज्या लोकांनी रात्री सहा तासांची पुरेशी झोप घेतलीय, त्यांना सर्दीचा धोका ४.२ टक्के जास्त होता. तर पाच तासांची झोप घेणाऱ्यांना सर्दीचा धोका ४.५ टक्के जास्त होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.