याचा वापर केल्यानं पायापासून डोक्यापर्यंत व्हाल सुंदर

हवामानातील बदलासोबतच अनेकांची त्वचा रुक्ष आणि निर्जीव बनते. अशात अनेक लोक विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र है सौंदर्यप्रसाधनं आपल्या त्वचेला हेल्दी बनवत नाही. त्यासाठी काही घरगुती उपाय वापरणं चांगला उपाय आहे. त्यासाठी आम्ही सांगतोय असे नॅच्युरल उपाय ज्यामुळं तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत सुंदर होऊ शकता. 

Updated: Jul 9, 2014, 05:41 PM IST
याचा वापर केल्यानं पायापासून डोक्यापर्यंत व्हाल सुंदर

उज्जैन: हवामानातील बदलासोबतच अनेकांची त्वचा रुक्ष आणि निर्जीव बनते. अशात अनेक लोक विविध सौंदर्यप्रसाधनांचा वापर करतात. मात्र है सौंदर्यप्रसाधनं आपल्या त्वचेला हेल्दी बनवत नाही. त्यासाठी काही घरगुती उपाय वापरणं चांगला उपाय आहे. त्यासाठी आम्ही सांगतोय असे नॅच्युरल उपाय ज्यामुळं तुम्ही पायापासून डोक्यापर्यंत सुंदर होऊ शकता. 

आम्ही बोलतोय ऑलिव्ह ऑईलबद्दल. ऑलिव्ह ऑईलमध्ये फ्लेवसेनॉयड्स स्कवेलीन आणि पोरीफेनोल्स अँटीऑक्सिडेंट्स असतात. जे फ्री रेडिकल्समधून सेल्सला डॅमेज होण्यापासून वाचवतात. जर याचा समावेश जेवणात केला असेल तर त्यामुळं ब्लडप्रेशरवर नियंत्रण मिळवता येतं. याचा वापर उटणे, फेस मास्क इत्यादीच्या रुपात वापर केला जावू शकतो. यामुळं त्वचेला Wrinkles पासून वाचवतात.

सुंदर नखं - साधारण अर्ध्या तासांसाठी ऑलिव्ह ऑईलमध्ये नखांना बुडवून ठेवा. यामुळं नखं आणि क्यूटिकल्स नरम आणि लवचिक होतात. कोणत्याही क्रीम पेक्षा याचा चांगला उपयोग होतो. तुम्हांला हवं असल्यास पाय स्वच्छ करून त्यावरही ऑलिव्ह ऑइल लावलं आणि कॉटनचे मोजे घातले, तर पॅडिक्योअरचीही गरज पडत नाही. 

गुलाबी ओठ- कोरडे, निर्जीव आणि फाटलेल्या ओठांवर ऑलिव्ह ऑइलनं हलकी मॉलिश सकाळ-संध्याकाळ करावी. यामुळं तुमचे ओठ सुदंर, मऊ होतील.

चेहरा उजळेल- चेहरा साध्या पाण्यानं स्वच्छ धुवून घ्या, त्यानंतर ऑलिव्ह ऑइलनं मसाज करा. मग अर्धा चमचा साखर घेवून चेहऱ्यावर घासून घ्या. शेवटी कोमट पाण्यात एक नरम कपडा भिजवून चेहरा स्वच्छ करा.काही दिवस असं केल्यानं चेहरा उजळेल. 

दूर होणार डँड्रफची समस्या - थोडसं ऑलिव्ह ऑइल आपल्या निर्जीव केसांच्या मुळाशी लावा, यामुळं केस सिल्की होतात. जर आपल्याला डँड्रफची समस्या असेल तर ते ही कमी होईल. 

आठवड्यातून तीन वेळा - आठवड्यातून तीन वेळा लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑइल मिसळून चेहऱ्याची मॉलिश करा, यामुळं केवळ Wrinkles नाही तर चेहऱ्याचा रंगही उजळतो. सोबतच केसांमध्ये लावल्यानं उत्तम कंडिशनरही होतो. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.