आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून ३० लाखांसह ५ किलो सोनं जप्त

तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत हे पैसे जप्त करण्यात आले. 

Updated: Dec 22, 2016, 01:47 PM IST
आयएएस अधिकाऱ्याच्या घरातून ३० लाखांसह ५ किलो सोनं जप्त title=

चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्य सचिवांच्या घरातून ३० लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाच्या कारवाईत हे पैसे जप्त करण्यात आले. 

आयकर विभागाने बुधवारी तामिळनाडूचे मुख्य सचिव राममोहन राव यांच्या अण्णा नगरमधील घरावर छापा टाकला. शेखर रेड्डीकडून मिळालेल्या माहितीवरुन हा छापा टाकला होता.

या छाप्यात ३० लाख रुपयांच्या नव्या नोटा आणि ५  किलो सोनं जप्त करण्यात आलं. 

चेन्नई एअरपोर्टवर छाप्यात १ कोटी ३४ लाख जप्त

चेन्नई एअरपोर्टवर १ कोटी ३४ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत, सर्व नोटा पिंक रंगाच्या आहेत. नोटाबंदीनंतर जुन्य आणि नव्या नोटा जप्तीचं सत्र सतत सुरू आहे. 

देशभरात आयकर विभागाची पथकं विविध ठिकाणी छापा टाकत आहे. यात आज पहाटे चेन्नई एअरपोर्टवर १ कोटी ३४ लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त झाल्य़ा. 

या सर्व नोटा २ हजार रुपयांच्या आहेत. पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली आहे.  हा पैसा कोणाचा आहे आणि तो  कुठे घेऊन जात होते, याची चौकशी सुरु आहे.