वृद्ध महिलेला तिच्याच बंगल्यात हातपाय बांधून जाळलं

दिल्लीत एका 81 वर्षीय वृद्ध महिलेचं जळालेलं प्रेत तिच्याच घरात आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. एका न्यूज एजन्सीशी संबंधित के. के. दुग्गल या माजी पत्रकाराची ही विधवा पत्नी होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

Updated: Jul 9, 2014, 02:48 PM IST
वृद्ध महिलेला तिच्याच बंगल्यात हातपाय बांधून जाळलं title=

नवी दिल्ली : दिल्लीत एका 81 वर्षीय वृद्ध महिलेचं जळालेलं प्रेत तिच्याच घरात आढळल्यानं एकच खळबळ उडालीय. एका न्यूज एजन्सीशी संबंधित के. के. दुग्गल या माजी पत्रकाराची ही विधवा पत्नी होती. या प्रकरणात पोलिसांनी महिलेच्या घरातील नोकराला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय.

साऊथ दिल्लीच्या पॉश ग्रेटर कैलाश या भागात रेखा दुग्गल या वृद्ध महिलेचं मृत शरीर रात्र 9.30 वाजता मिळालं. दुग्गल यांची छोटी बहिण, जावई आणि नोकर यांनी सर्वप्रथम दुग्गल यांचं प्रेत पाहिलं त्यानंतर त्यांनी तातडीनं पोलिसांना पाचारण केलं. 

दुग्गल यांच्या जावयानं – मनमोहन यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीला शेजाऱ्यांनी रेखा गायब असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर जेव्हा ते घरात दाखल झाले तेव्हा बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांचं प्रेत जळालेल्या अवस्थेत आढळलं. संपूर्ण घरभर धूर पसरला होता आणि समोरच दुग्गल यांचं प्रेत जळत होतं... त्यानंतर मनमोहन यांनी फायर सर्व्हिसला फोन करून तातडीनं बोलावून घेतलं.

एका पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, दुग्गल यांच्या पोस्टमॉर्टेम अहवालात प्रथम त्यांना मारहाण करण्यात आली... त्यानंतर त्यांचे हातपाय ओढनीनं बांधून त्यांना जाळण्यात आल्याचं उघड झालंय.  

पोलिसांना, सात महिन्यांपासून दुग्गल यांच्या घरात काम करणाऱ्या नोकरावर संशय असल्यानं त्यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलंय. घरात केवळ नोकर आणि रेखा दुग्गल याच राहत होत्या. 

चार मजल्यांच्या बंगल्यातील पहिला मजला रेखा दुग्गल यांच्या पतीनं आपल्या बहिणीला गिफ्ट केला होता तर दुसरा मजला त्यांनी आपल्या छोट्या बहिणीला गिफ्ट केला होता. तिसरा आणि चौथा मजला त्यांनी भाड्यानं दिला होता. पोलीस या प्रकरणात अधिक तपास सुरू आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.