एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक

काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Updated: Nov 28, 2015, 03:19 PM IST
एअर इंडिया विमान अपहरण धमकी, ISIS संबधीत तरुणाला अटक title=

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी एअर इंडियाला धमकी मिळाली होती. तुमचे विमान अपहरण करून उडवून देऊ, धमकी ISIS कडून देण्यात आली होती. याप्रकरणी ISIS संबधीत तरुणाला अटक करण्यात आली आहे.

अधिक वाचा : विमानाचे अपहरण करण्याची एअर इंडियाला ISISची धमकी

विमान अपहरणाच्या धमकीवरुन महेश मीना या २० वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे. आपण ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधीत असून एअर इंडियाच्या विमानाचं अपहरण करु, अशी धमकी महेशनं एअर इंडियाच्या कॉलसेंटरला दिली होती. 

ISISच्या या धमकीच्या आधारे पोलिसांनी महेशला मध्य प्रदेश मधून ताब्यात घेतले आहे. त्याला २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या अटकेमुळे एअर इंडियातील भितीचे वातावरण काहीप्रमाणत कमी झालेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.