'अमरावती' होणार नवी राजधानी!

आंध्रप्रदेश सरकारने बुधवारी राज्याच्या नवीन राजधानीचे नाव 'अमरावती' ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 'अमरावती' हा प्रदेश विजयवाडा-गुंटुर या क्षेत्रात आहे.

Updated: Apr 2, 2015, 01:32 PM IST
'अमरावती' होणार नवी राजधानी! title=

हैदराबाद : आंध्रप्रदेश सरकारने बुधवारी राज्याच्या नवीन राजधानीचे नाव 'अमरावती' ठेवण्याचा निर्णय घेतलाय. 'अमरावती' हा प्रदेश विजयवाडा-गुंटुर या क्षेत्रात आहे.

मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य कॅबिनेटमध्ये या संबधिचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. अमरावती शहर गुंटूर जिल्ह्यात आहे. 

या शहराच्या ऐतिहासिक, अध्यात्मिक आणि पौराणिक वारसाला महत्त्व देत या शहराला राजधानीचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 

मुख्यमंत्रीएन चंद्रबाबू नायडू यांनी पुराणकथांचा दाखला देत हे शहर म्हणजे 'देवांचा राजा इंद्र याचं शहर' असल्याचं म्हटलंय.

कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या शहराचं नाव गावातील अमरेश्वर देवाच्या नावावरुन ठेवण्यात आलं होतं. 

हे शहर दक्षिण काशी या नावानेही ओळखले जाते. तसेच ४०० वर्ष सातवाहनांची हे शहर राजधानी होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.