मोदींची टर उडवणाऱ्यावर 'ANI' करणार कारवाई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर उडवणाऱ्यावर न्यूज एजन्सी 'एएनआय' कायदेशीर कारवाई करणार आहे. 

Updated: Apr 14, 2015, 06:45 PM IST
मोदींची टर उडवणाऱ्यावर 'ANI' करणार कारवाई title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टर उडवणाऱ्यावर न्यूज एजन्सी 'एएनआय' कायदेशीर कारवाई करणार आहे. 

एएनआयचा ट्विटर हॅंडल हॅक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एका अज्ञात व्यक्तीनं टर उडवलीय. मोदींविषयी केलेल्या ट्विटचा फोटो सध्या सोशल वेबसाईटवर वायरल होतोय. 

यामध्ये, 'जर्मनीवर माझं दशकांपासून प्रेम आहे. जेव्हा मी गुजरातमध्ये राहणारा एक छोटा मुलगा होतो तेव्हा माझा एकमात्र मित्र होता, तो म्हणजे जर्मन शेपर्ड - पंतप्रधान' असं ट्विट एएनआयच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलं होतं. 


सोशल वेबसाईटवर फिरणारा फोटो

जर्मन शेपर्ड ही कुत्र्याची एक जात आहे. यावर, स्पष्टीकरण देताना एएनआयनं हे ट्विट आपण केलं नसल्याचा दावा केलाय. 

हा फोटो फोटोशॉपच्या माध्यमातून तयार करण्यात आल्याचंही एएनआय यांनी म्हटलंय. सोबतच, हा आगावूपणा करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही या न्यूज एजन्सीनं स्पष्ट केलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.