लष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या

ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 10, 2017, 09:18 AM IST
लष्करातील डॉक्टरांची गोळ्या घालून हत्या title=

शोपियाँ : काश्मीरच्या शोपियाँ गावात लष्काराच्या लेफ्टनंट दर्जाच्या अधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. लेफ्टनंट उमर फैय्याज यांनी नुकतीच डॉक्टर म्हणून भारतीय लष्करात नोकरी मिळवली होती. 

ते मूळचे कुलगाम जिल्ह्यातील राहाणारे होते. त्यांच्या हत्येमागचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. उमर फैय्याज यांच्या शरीरात १९ गोळ्या सापडल्या आहेत.