१७ ऑक्टोबरला केजरीवालांचा आणखी एक धमाका

केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपलं आंदोलन सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतलाय.

Updated: Oct 15, 2012, 06:17 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
केंद्रीय कायदेमंत्री सलमान खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी करत जंतरमंतरवर धरणं आंदोलनाला बसलेल्या अरविंद केजरीवाल यांनी आपलं आंदोलन सध्या तरी थांबवण्याचा निर्णय घेतलाय.
इंडिया अगेन्स्ट करप्शन (आयएसी)चे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी आपलं आंदोलन मागे घेतलंय. सलमान खुर्शीद यांच्या क्षेत्रात म्हणजेच फारुखाबादमध्ये एक नोव्हेंबर रोजी आंदोलन करत विरोध प्रदर्शन करण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. खुर्शीद यांच्या ट्रस्टवर केल्या जाणाऱ्या आरोपांवर भाजपनं मात्र मौनव्रत धारण केलंय. यावर अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि काँग्रेस दोघांची ही मिलीभगत असल्याची टीका केलीय. देशातील व्यवस्थाच भ्रष्ट झालीय असं उद्विगतेनं त्यांनी म्हटलंय. यावेळी आपण १७ ऑक्टोबर रोजी आणखी एक मोठा खुलासा करणार असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी घोषणा केलीय.
अपंग व्यक्तींसाठी आरोग्य शिबिरे न घेताच सरकारी निधी लाटल्याचा आरोप लुईस आणि सलमान खुर्शीद यांच्यावर करण्यात आला होता. त्यावर खुर्शीद यांनी स्पष्टीकरणही दिलं होतं. पण, अरविंद केजरीवाल यांनी चौकशीची मागणी करत खुर्शीद यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.