'अक्कल असती तर पप्पूला मीच पंतप्रधान केलं असतं'

योगगुरु रामदेव बाबा आता योगा सोडून आता राजयोगाला लागलेत. ‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारे सरकार आहे तसेच रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’ असं म्हणत मोठी टीका केलीय.

Updated: Jul 18, 2013, 12:22 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, लखनऊ
योगगुरु रामदेव बाबा योगासोडून आता राजयोगाच्या मार्गावर आहेत. त्यांच्या टार्गेटवर आहेत काँग्रेस, सोनिया गांधी आणि राहुल गांधी...
‘काँग्रेस हे लोकांच्या धोरणांना विरोध करणारं सरकार आहे... रायबरेलीला १९७७ मध्ये इंदिरा गांधीची जशी अवस्था झाली तशीच सोनिया गांधीची होणार आहे’, असं म्हणत बाबा रामदेव यांनी काँग्रेसवर चांगलीच टीका केली. राहुल गांधीवरही कडक टीका करत त्यांनी पंतप्रधानपदासाठी त्याला अयोग्य ठरवले.
‘मी स्वत: रायबरेलीमध्ये जाऊन सोनिया गांधींविरुद्ध उमेदवार उभा करीन आणि त्याला जिंकवून दाखवेन' अशी एकप्रकारे हुलकावणीच रामदेव बाबांनी दिलीय. 'राहुल गांधी कधीच एफडीआय आणि काळ्या पैशांसंबधी बोलत नाही... त्या भोंदू पप्पूमध्य़े जर अक्कल असती तर मीच त्याला पंतप्रधान केलं असतं' असं म्हणत त्यांनी राहुल गांधींची 'अक्कल'च बाहेर काढलीय. मुघल आणि इंग्रजांनी जितकं देशाला गेल्या हजार वर्षात लुटलं नसेल तितकं गेल्या ६७ वर्षात काँग्रेसने देशाला लुटलंय' असं म्हणत बाबांनी काँग्रेस पक्षाचे वाभाडेच काढले.

भाजपाकडून निवडणुकीचं तिकीट मिळण्याबाबत रामदेव म्हणतात. 'मी मोदींना साथ देणे याचा अर्थ असा नाही की मी निवडणुक लढणार नाही. जर भाजप आणि मोदी यांच्या मुद्द्यांशी सहमती झाली नाही तर मीही निवडणूक लढवू शकतो... भाजपची तत्वं, धोरण, हेतू स्पष्ट करणारा जाहीरनामा आल्यानंतरच निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय घेईन' असं म्हणत रामदेव बाबांनी अप्रत्यक्षपणे त्यांनी निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.