बिहार पराभव भाजपच्या जिव्हारी, आरोप-प्रत्यारोप सुरुच

भाजपमधल्या काही नेत्यांना बिहारचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत.

Updated: Nov 10, 2015, 03:47 PM IST
बिहार पराभव भाजपच्या जिव्हारी, आरोप-प्रत्यारोप सुरुच title=

नवी दिल्ली : भाजपमधल्या काही नेत्यांना बिहारचा पराभव चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळं आरोप प्रत्यारोपाच्या फैरी अजूनही थांबायला तयार नाहीत.

भाजप नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील खासदार हुकुमदेव यादव यांच्यानंतर आता बेगूसरायचे खासदार भोला सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य केलंय. पंतप्रधान मोदींनी विकासाची भाषा सोडून आरोपांची मर्यादा ओलांडल्यानंच भाजपचा पराभव झाल्याचा आरोप भोला सिंह यांनी केलाय. 

मोदी-शाह यांचे भाजपातले अंतर्गत विरोधक बिहारच्या पराभवाच्या निमित्तानं दोघांना लक्ष्य करण्याची संधी साधत असल्याचं चित्र दिसतंय. बिहारमधल्या दारूण पराभवानंतर भाजपमध्ये अंतर्गत आरोपप्रत्यारोपांच्या फैरी वाढत चालल्यात. पाटणा साहिबचे भाजप खासदार आणि अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्याच्या तिखट टीकेला तितकच जळजळीत उत्तर दिलंय.  

गाडीच्या मागे धावणाऱ्या कुत्र्याला गाडी आपल्यामुळेच धावतेय असा समज असोत. प्रत्यक्षात कुणा एका मुळे पक्ष चालत नाही असं कैलाश विजयवर्गीयांनी शत्रूघ्न सिन्हा यांना उद्देशून म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना शत्रूघ्न सिन्हा यांनी ट्विटरवरून दिलंय. हाथी चले बिहार....भुंके हजार असं म्हणून विजय विजयवर्गीयांना खोचक टोला हाणलाय.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.