संरक्षणमंत्री अँन्टोनी विरोधात लोकसभेत नोटीस

संरक्षणमंत्री ए.के.अँन्टोनी यांच्या विरोधात भाजपनेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत नोटीस बजावलीय. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार हल्ला केला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 7, 2013, 11:55 AM IST

www.24taas.com, झी मीडिया,नवी दिल्ली
संरक्षणमंत्री ए.के.अँन्टोनी यांच्या विरोधात भाजपनेते यशवंत सिन्हा यांनी लोकसभेत नोटीस बजावलीय. तर विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी जोरदार हल्ला केला. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
पाकिस्तानी सैन्याच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून अतिरेक्यांनीच जवानांवर हल्ला केला, असे धक्कादायक वक्तव्य संरक्षणमंत्री ए के अँन्टोनी यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या विधानावरून संसदेत गदारोळ झाला. दोन्ही सभागृहांचे कामकाज बंद करण्यात आलेय.
अँन्टोनी यांच्या या विधानानंतर संसदेत नापाक हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले. यासंदर्भात निवेदन करताना संरक्षणमंत्री अँन्टोनी यांनी केलेल्या वक्तव्याचा राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरुण जेटली यांनी चांगलाच समाचार घेतला. तर पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिले पाहिजे, असा आक्रमक पवित्रा यशवंत सिन्हा यांनी घेतला. तर अँन्टोनी यांनी आपले विधान बदलले आहे, असा आरोप सुषमा स्वराज यांनी केला. अँन्टोनी यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली आहे.

अँन्टोनी यांच्या वक्तव्यामुळं पाकिस्तानला बचावासाठी आयती संधी मिळाली असल्याचा आरोप जेटली यांनी केला. पाकिस्तानी सैन्याच्या वेशात भारतीय हद्दीत घुसून अतिरेक्यांनीच जवानांवर हल्ला केल्याचं वक्तव्य, अँन्टोनी यांनी आपल्या निवेदनात केलं होतं.
दरम्यान, पंतप्रधानांनी संध्याकाळी साडेचार वाजता भाजप नेत्यांची बैठक बोलावलीय. पाकिस्तानकडून झालेल्या हल्यासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आलीय. एकीकडे चर्चचं नाटक करून दुसरीकडे हल्ले करायचे. या पाकिस्तानच्या भूमिकेवर सरकार काय पावलं उचलणार आहे. याबाबत पंतप्रधानांना विचारणार असल्याचं भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी म्हटलंय. देशभरात संतापाची लाट उसळलीय. त्यामुळे आतातरी सरकारनं कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.