उत्तरखंडमध्ये भाजपच्या आशा पुन्हा पल्लवीत

उद्या घेण्यात य़ेणा-या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला सहा एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही सहा एप्रिललाच कोर्ट निर्णय़ देणार आहे. 

Updated: Mar 30, 2016, 11:00 PM IST
उत्तरखंडमध्ये भाजपच्या आशा पुन्हा पल्लवीत title=

उत्तरखंड : उद्या घेण्यात य़ेणा-या काँग्रेसच्या विश्वासदर्शक ठरावाला नैनिताल हायकोर्टाच्या दोन न्यायाधिशांच्या पीठानं स्थगिती दिली आहे. पुढील सुनावणी ६ एप्रिलला घेण्यात येणार आहे. कोर्टानं काँग्रेसला सहा एप्रिलपर्यंत यावर मत नोंदवण्याचे आदेश दिले असून केंद्रालाही प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच राष्ट्रपती राजवटीच्या वैधतेबाबतही सहा एप्रिललाच कोर्ट निर्णय़ देणार आहे. 

नैनिताल हायकोर्टाच्या कालच्या निर्णयाला आव्हान देत केंद्रानं नैनिताल हायकोर्टात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू असताना बहुमत सिद्ध करणं अयोग्य असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला होता. ही याचिका दाखल करून घेत कोर्टानं उद्याच्या विश्वासदर्शक ठरावाला स्थगिती दिलीय. त्यामुळं भाजपच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या आहेत.