'भाजप खासदारांवरील टीएमसीचे आरोप चुकीचे'-पाल

खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत लज्जास्पद वर्तन करत संसदेची शोभा केलीय. महागाईवर चर्चा सुरू असताना भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली. 

Updated: Jul 8, 2014, 11:22 PM IST
'भाजप खासदारांवरील टीएमसीचे आरोप चुकीचे'-पाल title=

नवी दि्ल्ली : खासदारांनी पुन्हा एकदा लोकसभेत लज्जास्पद वर्तन करत संसदेची शोभा केलीय. महागाईवर चर्चा सुरू असताना भाजप आणि टीएमसीच्या खासदारांमध्ये अचानक बाचाबाची झाली. 

रेल्वे बजेट सादर होत असताना एका भाजप खासदारानं दारू पिऊन शिवीगाळ करत धमकावल्याचा आरोप टीएमसीच्या महिला खासदार काकोली घोष यांनी केला. त्याला भाजपच्या खासदारांनी आक्षेप घेतला. मात्र यावर हे प्रकरण थांबले नाही. 

टीएमसी आणि भाजपचे खासदार हातापाईवर येत थेट लोकसभेच्या बाहेर धावत गेले. त्यामुळं मोठा गोंधळ उडाला. दरम्यान भाजप नेते जगदंबिका पाल यांनी टीएमसीचे आरोप फेटाळले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.