फेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो

 उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली. 

Updated: Aug 26, 2015, 06:12 PM IST
फेसबूकवर प्रियकराने अपलोड केले प्रेयसीचे अश्लिल फोटो  title=

मैनपुरी :  उत्तर प्रदेशात एका प्रेयसीने दुसऱ्याशी लग्न केल्याने नाराज झालेल्या प्रियकराने तिचे काही अश्लिल फोटो फेसबूकवर अपलोड केले. यामुळे वैतागलेल्या नवविवाहितेने गोळी झाडून आत्महत्या केली. 

पोलीस या प्रकरणी गुन्हा दाखल करून चौकशी करत आहे. सुरूवाती चौकशीत मिळालेल्या साक्षी-पुराव्यातून महिलेचा खून झाल्याच्या शक्यतेचा पोलीस विचार करत आहेत. 

अधिक वाचा : बनावट फेसबुक अकाऊंट उघडून महिलांना अश्लिल मॅसेज पाठवणाऱ्याला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, मैनपुरी पोलिस स्टेशन हद्दीतील गोपाळनगर येथील ही घटना आहे. या ठिकाणी राहणार्या प्रखर दुबे याचे ३० मे रोजी आग्रा रोडला राहणाऱ्या शालिनीशी लग्न झाले. शालिनीचे लग्नापूर्वी प्रेम संबंध होते. तिच्या लग्नाने नाराज असलेल्या पूर्व प्रियकराने फेसबूकवर एक बनावट आयडी बनविला आणि काही अश्लिल फोटो अपलोड केले. 

फेसबूकवर अश्लिल फोटो अपलोड़ केल्यामुळे झालेल्या बदनामीने शालिनी खूप हैराण झाली. त्यामुळे तिने गोळी मारून आत्महत्या केल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळावरून जप्त केलेली पिस्तुल गावठी आहे. प्राथमिक चौकशीत लक्षात आले की या खूनाचीही शक्यता असू शकते. 

अधिक वाचा : मुलीची क्लिप व्हॉटस अॅपवर व्हायरल, पित्याची आत्महत्या

या संदर्भात पोलिसांनी सांगितले की, फेसबूकवर पोस्ट संदर्भात सर्व बाबींची चौकशी केली जात आहे. पोस्ट मार्टम रिपोर्टमध्ये मृत शरिराला ओढत नेले होते. गोळी पोटात लागली आहे. सुसाईड नोटही मिळाला आहे. मृत महिलाच्या पूर्व संबंधाचाही विचार करता हे प्रकरण खूनाच्या दिशेने जाते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.