'बाय बाय स्मृती इराणी' - कन्हैया कुमार

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे,  स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल कन्हैया कुमारने अप्रत्यक्ष आनंद व्यक्त केला आहे.

Updated: Jul 6, 2016, 07:11 PM IST
'बाय बाय स्मृती इराणी'  - कन्हैया कुमार title=

नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याने इराणी यांचे स्वागत करून बाय बाय स्मृती इराणी असे म्हटले आहे,  स्मृती इराणी यांच्याकडील मनुष्यबळ विकासमंत्री हे खाते काढून घेतल्याबद्दल कन्हैया कुमारने अप्रत्यक्ष आनंद व्यक्त केला आहे.

कन्हैया कुमार म्हणाला,' हैदराबाद येथील दलित नेता रोहित वेमुला याच्या आत्महत्ये प्रकरणाची इराणी यांना ही 'शिक्षा' नाही. परंतु, वेमुलाच्या आत्महत्येप्रकरणी त्यांनी काही केले नाही. रोहितला अद्यापही न्याय मिळालेला नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात झालेला बदल ही एक शिक्षाच आहे.'

'वेमुलाचा छळ केल्याप्रकरणी मंत्री बंगारू दत्तात्रेय यांना कारागृहात पाठवायला हवे', कन्हैया कुमारने म्हटले आहे.