बॉल लागल्याच्या कारणाने डॉक्टरची हत्या

 क्रिकेट बॉल लागल्याच्या कारणावरून दिल्लीमध्ये एका डेंटिस्टची निर्घृण हत्या करण्यात आलीये. 

Updated: Mar 25, 2016, 04:29 PM IST
बॉल लागल्याच्या कारणाने डॉक्टरची हत्या  title=

नवी दिल्ली :  क्रिकेट बॉल लागल्याच्या कारणावरून दिल्लीमध्ये एका डेंटिस्टची निर्घृण हत्या करण्यात आलीये. 

पंकज नारंग असं त्यांचं नाव आहे. हा डॉक्टर आणि त्याचा मुलगा घरात क्रिकेट खेळत होते. खेळता खेळता बॉल गॅलरीतून बाहेर गेला आणि बाईकवरच्या एका माणसाला लागला. त्यावरून त्याची नारंग यांच्यासोबत बाचाबाची झाली. 

या व्यक्तीनं आपल्या 8-10 मित्रांना बोलावलं आणि डॉक्टरला लाठ्या आणि विटांनी जबर मारहाण केली. यात डॉक्टर जागीच ठार झाला. 4 संशयितांना अटक करण्यात आली असून चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय.