कलामांच्या या फेसबुक, टवीटर पेजचा 'वारस कोण?'

माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर, त्यांच्या ट्ववीटर आणि फेसबुक अकाऊंटवरून वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम हे शिलाँगच्या आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते, तेव्हा ते अचानक खाली कोसळले, यावेळी कलामांसोबत श्रीजन पाल सिंह हे होते, त्यांनी कलामांसोबतचा हा दिवस फेसबुकवर शेअर केला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला.

Updated: Aug 6, 2015, 03:46 PM IST
कलामांच्या या फेसबुक, टवीटर पेजचा 'वारस कोण?' title=

चेन्नई : माजी राष्ट्रपती डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांच्यानंतर, त्यांच्या ट्ववीटर आणि फेसबुक अकाऊंटवरून वाद सुरू झाला आहे. डॉ. कलाम हे शिलाँगच्या आयआयएममध्ये व्याख्यान देण्यासाठी गेले होते, तेव्हा ते अचानक खाली कोसळले, यावेळी कलामांसोबत श्रीजन पाल सिंह हे होते, त्यांनी कलामांसोबतचा हा दिवस फेसबुकवर शेअर केला, त्याला मोठा प्रतिसाद लाभला.

कलामांच्या आठवणींवर आधारीत एफबी पेजवर वाद 

पेजचं नाव -  Dr. APJ Abdul Kalam: Missions and Memories
श्रीजन पाल सिंह यांनी यानंतर कलाम यांच्या आठवणीत  (डॉ.एपीजे अब्दुल कलाम : मिशन अॅण्ड मेमरीज) फेसबुक पेज आणि ट्ववीटर अकाऊंटही सुरू केलं, आणि त्यांनी कलाम यांचे सर्व अपडेट देण्यास सुरूवात केली, डॉ. कलाम यांच्या आठवणीत हे एफबी पेज सुरू केल्याचं श्रीजन यांनी सांगितलं, यावर कलामांनी सांगितलेले विचार लिहण्यात आले नाहीत, तसेच या पेजवर कलाम यांचं मिशन काय होतं हे सांगण्यात आलेलं नाही, फक्त कलाम यांची आठवण म्हणून हे पेज असल्याचं श्रीजन पाल यांनी सांगितलं.

काही तासात श्रीजन पाल यांना देश ओळखू लागला
डॉ. कलाम यांच्यानंतर त्यांची आठवण म्हणून सुरू करण्यात आलेल्या या पेजला मोठ्या प्रमाणात फॅन्स फॉलो करत होते, कलामांचा शेवटचा दिवस काय होता, कलाम काय म्हणाले, ते त्या दिवशी कोण-कोणत्या विषयावर चर्चा करत होते, अशी माहिती त्यावर देण्यात आली होती. यामुळे कलामांनी आपल्यासोबत सोशल नेटवर्किंग आणि खासगी कामासाठी नेमलेले त्यांचे सहकारी श्रीजन पाल हे चर्चेत आले, श्रीजन पाल यांना काही तासात देश ओळखू लागला.

कलामांसोबत पुस्तकाचे सह लेखक असलेले व्ही पोनराज नाराज
मात्र यावर डॉ.कलाम यांच्यासोबत दीर्घकाळ असलेले, तसेच आयआयएमचे ग्रॅज्युएट  व्ही पोनराज यांनी यावर नाराज असल्याचं दिसतंय, व्ही पोनराज यांनी डॉ.कलाम यांनी एक पुस्तक लिहलंय, त्यात व्ही पोनराज हे सह लेखक देखील आहेत.

श्रीजन पाल सिंह हे सरकारकडून नेमलेले नाहीत
कारण डॉ. कलाम यांच्या कार्यालयाने जाहीर केलं की, श्रीजन पाल हे डॉ. कलाम यांच्यासोबत बाहेरून काम करत होते, यानंतर ते कलाम यांचं एफबी पेज अपडेट करत असले, तरी ते ऑफिशियल पेज नाही. श्रीजन पाल हे जे काही या पेजवर लिहितात, ते अधिकृत नाही. कलाम यांच्या कार्यालयाचे कार्यकारी सचिव एच श्रीडॉन यांनी ही माहिती दिली आहे.

कलाम यांच्याविषयी लिहितच राहणार
यावर उत्तर देतांना श्रीजन पाल सिंह यांनी म्हटलं आहे की, "मला याचा वाद निर्माण करायचा नाहीय की, डॉ. कलाम यांच्या एफबी पेजविषयी त्यांचं कार्यालय काय म्हणतं, मी हे डॉ. कलाम यांचं अधिकृत पेज आहे, असा दावा कधीच केला नाही. मी यावर माझे विचार शेअर केले, जे कलाम यांच्याविषयी होते, कलाम आपला आत्मविश्वास कसा वाढवत होते, याविषयी मी लिहलं आहे. आणि ते मी सोशल नेटवर्किंगवर कायम लिहित राहणार आहे."

कलामांशी जवळीक सांगण्याची स्पर्धा
काही पत्रकार, कार्यकर्ते, कलाम यांचे कर्मचारी नेहमीच आपण कलामांच्या कसे जवळ होते, असं सांगण्याचा प्रयत्न करतात. यावरून माजी राष्ट्रपती डॉ.कलाम यांचं श्रीजन पाल सिंग यांनी त्यांच्या आठवणींवर तयार केलेलं, एफबी पेज आणि टवीटर हॅण्डल बंद करण्याचा सल्ला, डॉ.कलाम यांच्या कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

कशासाठी पेज बंद करण्याचा सल्ला दिला?
आम्ही श्रीजन पाल यांना सांगत नाहीत की, त्यांनी कलाम यांच्याविषयी बोलू नये, पण आम्ही हे स्पष्ट करू इच्छीतो की, हे अधिकृत नाही, कारण आम्हाला याविषयी अनेक कॉल्स येत आहेत, त्यात ही विचारणा होती की श्रीजन पाल सिंह हे कलाम यांच्यासोबत होते का?, डॉ. कलाम यांच्यानंतर कलामांचं कार्यालय देखील बंद करण्यात येणार असल्याची माहिती कार्यालयाचे कार्यकारी सचिव श्रीडॉन यांनी दिलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.