राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन

केदारनाथचे दरवाजे सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी उघडण्यात आलेत. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं.

Updated: Apr 24, 2015, 10:16 PM IST
राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन title=

नवी दिल्ली : केदारनाथचे दरवाजे सकाळी ८ वाजून ५० मिनिटांनी उघडण्यात आलेत. यावेळी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी केदारनाथाच्या चरणी लीन झाल्याचं पाहायला मिळालं.

हुल गांधींनी यावेळी केदारनाथाची पूजा केली. केदारनाथाकडे काही मागितलं नसल्याचं यावेळी राहुल गांधी यांनी सांगितलं. आपण मंदिरात जातो मात्र काही मागत नाही असंही त्यांनी सांगितलं. केदारनाथाचं दर्शन घेऊन नवी ऊर्जा मिळाल्याचंही राहुल यांनी म्हटलंय. याशिवाय केदारनाथाच्या दर्शनासाठी घेणारे भाविक आणि पर्यटकांची भिती घालवण्यासाठी इथपर्यंत पायी आल्याचं राहुल गांधींनी सांगितलं.. महाप्रलयावेळी केदारनाथमध्ये राबवण्यात आलेल्या मदतकार्याचं राहुल गांधींनी कौतुक केलं. 

दरम्यान, राहुल गांधींच्या या केदारनाथ यात्रेवर भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी खोचक प्रतिक्रिया दिलीये. माणूस हारायला लागला, की देवदर्शनाला लागतो असं महाराजांचं म्हणणं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.