निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू

क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

Updated: May 19, 2016, 07:39 PM IST
निवडणुकीत जिंकला हा माजी क्रिकेटपटू title=

कोलकता: क्रिकेटच्या मैदानावर वेगवान गोलंदाजीने प्रतिस्पर्धी फलंदाजांना क्लीन बोल्ड करणाऱ्या माजी क्रिकेटपटू एस श्रीसंतला मात्र निवडणुकीच्या रिंगणातील पहिल्याच डावात क्लीन बोल्ड व्हावे लागले. 

श्रीसंत तिरुअनंतपुरम मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत होता. मात्र श्रीसंतला मतदाराराजाने साफ नाकारले. 

एकीकडे श्रीसंत हा तिरुअनंतपुरममधून हारला असला तरी, पश्चिम बंगालमध्ये मात्र भारताचा माजी क्रिकेटपटू लक्ष्मीरतन शुक्लाचा विजय झाला आहे. बंगालच्या उत्तर हावडा मतदार संघातून शुक्लानं भाजपच्या रुपा गांगुलींचा पराभव केला.