भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली

पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.

Updated: Nov 5, 2015, 03:49 PM IST
भारतातील वातावरण निवळेपर्यंत कार्यक्रमाला येणार नाही - गुलाम अली title=

नवी दिल्ली: पाकिस्तानी गझल गायक गुलाम अली यांनी भारतातील आपल्या सर्व आगामी संगीत मैफली रद्द केल्यात. भारतातील वातावरण निवळल्यानंतर आपण कार्यक्रम करू, असं त्यांनी म्हटलंय.

आणखी वाचा - मुंबईतील कार्यक्रम रद्द झाल्यानं गुलाम अली दु:खी

गेल्या महिन्यात शिवसेनंनं त्यांचा मुंबईतील कार्यक्रम उधळून लावला होता. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचं गुलाम अली यांचे चिरंजीव अमीर यानं म्हटलंय. या निर्णयामुळे आता गुलाम अली यांचा ८ नोव्हेंबरला आपतर्फे दिल्लीत होणारा कार्यक्रम रद्द करण्यात आलाय.

आणखी वाचा - शिवसेनेच्या विरोधानंतर गुलाम अलींचा मुंबईतील कार्यक्रम रद्द

यापूर्वी जगजित सिंह यांच्या स्मरणार्थ मुंबईत आयोजित कार्यक्रम शिवसेनेच्या विरोधामुळे आयोजकांनी रद्द केली होती. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. पण आता गुलाम अली यांनीच हा कार्यक्रम रद्द केलाय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.