घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर!

गुजरातच्या एका कुटुंबाला धक्काच बसला... कारण, त्यांनी सकाळी उठून बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या बाथरुममध्ये एक मगर आ वासून पहुडलेली त्यांना आढळलं. 

Updated: Jul 30, 2014, 04:39 PM IST
घरातल्या बाथरुममध्ये सापडली मगर! title=

आणंद : गुजरातच्या एका कुटुंबाला धक्काच बसला... कारण, त्यांनी सकाळी उठून बाथरुमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांच्या बाथरुममध्ये एक मगर आ वासून पहुडलेली त्यांना आढळलं. 

गुजरातच्या आणंद जिल्ह्यातील सोजित्रामध्ये एका रेसिडेन्शिल सोसायटीत ही घटना घडलीय. सोसायटीतील एका घरातील बाथरुममध्ये तब्बल 5 फूट लांबीची मगर सापडली. ही घटना 21 जुलै रोजी घडली. 

या घटनेमुळे या घरात राहणाऱ्या पटेल कुटुंबीयांना मोठा धक्का बसलाय. भरत पटेल यांनी ही मगर सर्वात अगोदर आपल्या घराच्या बाथरुममध्ये पाहिली होती. त्यानंतर त्यांनी ताबडतोब प्रसंगावधान राखून बाथरुमचा दरवाजा बाहेरून बंद करून घेतला... आणि बाहेर धाव घेतली. आरडाओरडा करून पटेल यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतलं.

त्यानंतर, जंगल अधिकाऱ्यांनी या मगरीला आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांनी जवळच्याच मालताज गावातील एका तळ्यात या मगरीला सोडून दिलं.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.