हरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही'

हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. 

PTI | Updated: Nov 28, 2015, 02:16 PM IST
हरियाणाच्या मंत्र्याने महिला एसपीला म्हटले, गेट आऊट, उत्तर मिळाले 'जाणार नाही' title=

फतेहाबाद : हरिणायाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांना एका बैठकीतून नाराज होऊन जावे लागले. कारण की, महिला जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी त्यांना कडक भाषेत उत्तर दिले. आरोग्य मंत्र्यांनी या महिला पोलीस अधिकाऱ्याला गेट आऊट म्हटले. त्यावर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाणार नाही, असे स्पष्ट बजावले. 

महिला पोलीस अधिकारी यांना कॉन्फरन्स रुममधून जाण्यासाठी खून केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संगीता कालिया तिथेच होत्या. त्यांनी रुममधून बाहेर जाण्यास नकार दिला. जिल्हा तक्रार आणि जनसंपर्क समितीच्या बैठकीच्यावेळी हा प्रकार घडला.

बैठकीला उपायुक्त एनके सोलंकी उपस्थित होते. मंत्री रागाने या बैठकीतून निघून गेलेत. त्यानंतर सोलंकी यांनी बैठक सुरुच ठेवली.  

मंत्र्यांनी पोलीस अधीक्षक संगीता कालिया यांना गावातील दारु धंद्यांबाबत माहिती विचारली. अवैध धंद्यांवर काय कारवाई केलीत. त्यावर त्यांनी सांगितले गेल्या १० महिन्यात नियमानुसार २५०० घटनांबाबत कारवाई केली असून गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तसा रेकॉर्डही आहे.

या उत्तराने आरोग्य मंत्र्यांचे समाधान झाले नाही. यावरून दोघांमध्ये खडाजंगी उडाली. मंत्री भडकल्यानंतर महिला एसपी यांना गेट आऊट म्हटले. मात्र, महिला पोलीस अधिकाऱ्यांनी जाण्यास चक्क नकार दिला. मी चुकीचे असे काहीही केलेले नाही. मंत्र्यांचेच चुकल्याचे या महिला अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

आरोग्य मंत्री बैठकीतून बाहेर गेल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनीही बैठकीतून जाणे पसंत केले. या प्रकारानंतर अधिकारी आणि सरकारमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी अधिकाऱ्यांनी घोषणाबाजीही केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.