भाजप जिंकला तर मोदी घेणार नोटबंदी सारखे मोठे निर्णय

नोटबंदीनंतर पाच राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. आज पाचही विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सगळ्याच एग्जिट पोल्समध्ये भाजपला ५ पैकी ४ राज्यांमध्ये मोठं यश मिळेल असं समोर येत आहे. 

Updated: Mar 11, 2017, 08:54 AM IST
भाजप जिंकला तर मोदी घेणार नोटबंदी सारखे मोठे निर्णय title=

नवी दिल्ली : नोटबंदीनंतर पाच राज्यांमध्ये निवडणूका पार पडल्या. आज पाचही विधानसभा निवडणुकांचा निकाल लागणार आहे. सगळ्याच एग्जिट पोल्समध्ये भाजपला ५ पैकी ४ राज्यांमध्ये मोठं यश मिळेल असं समोर येत आहे. 

उत्तरप्रदेशसह इतर राज्यामध्ये जर भाजप सरकार आलं तर यामुळे पंतप्रधान मोदींचं वर्चस्व आणखी वाढणार आहे. भाजपने पाचही राज्यांमध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात निवडणूक लढवली. जर भाजपने यश मिळवलं तर मोदी लाट अजूनही कायम आहे असं म्हणता येईल. पंतप्रधान मोदींनी नोटबंदी सारखे घेतलेले निर्णय हे लोकांच्या नजरेने योग्य होते की नव्हते हे या निवडणुकांच्या निकालावरुन स्पष्ट होईल.

पंतप्रधान मोदींनी नोटबंदीनंतर अजून काही कठोर निर्णय घेणार असल्याचं म्हटलं आहे. बेहिशोबी मालमत्ता असणाऱ्या लोकांना दणका देण्याचा सरकारचा पुढचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी लवकरच नवा कायदा लागू करण्यासाठी सरकारचा प्रयत्न असणार आहे.

मोदी सरकार गोल्ड मोनेटाइजेशन स्कीमला प्रोत्साहन देऊ इच्छिते. नोटबंदीमध्ये गडबड करणाऱ्या लोकांविरोधातही सरकार मोठी कारवाई सरकार करु शकते. पंतप्रधानांनी अनेकदा गॅस सबसिडी सोडण्यासाठी आवाहन केलंय त्यामुळे यानंतर सबसिडीमध्ये देखील कपात होऊ शकते.

जीएसटी लागू झाल्यानंतर महागाई वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईशी दोन हात करण्यासाठी सरकार काही कठोर निर्णय घेऊ शकते. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नाही पण जर पाच राज्यांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं तर राज्यसभेतही भाजपची ताकद वाढणार आहे आणि अनेक बिलं राज्यसभेत पास करणं सोपं होणार आहे.