भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे होऊ देणार नाही : हार्दिक पटेल

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वन-डे सामना राजकोट येथे होत आहे. मात्र, या सामन्याची तिकिटे पाटीदार समाजातील लोकांना दिली गेली नाहीत, असा दावा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. त्यामुळे हा सामना होऊ देणार नाही, असा गर्भीत इशारा दिलाय.

PTI | Updated: Oct 17, 2015, 01:50 PM IST
भारत-दक्षिण आफ्रिका वन-डे होऊ देणार नाही : हार्दिक पटेल  title=

गांधीनगर : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा वन-डे सामना राजकोट येथे होत आहे. मात्र, या सामन्याची तिकिटे पाटीदार समाजातील लोकांना दिली गेली नाहीत, असा दावा पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी केलाय. त्यामुळे हा सामना होऊ देणार नाही, असा गर्भीत इशारा दिलाय.

गुजरातमध्ये पाटीदारांना आरक्षण मिळावे यासाठी हार्दिक पटेल यांनी मोठे आंदोलन केले. आमचा लढा सुरु आहे, असे त्यांनी म्हटलेय. दरम्यान, रविवारी राजकोटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात वन-डे सामना होत आहे. पाटीदार समाजाच्या क्रिकेटप्रेमींना तिकिटे मिळू नयेत, यासाठीच या सामन्याची सर्व तिकिटे भाजपाच्या कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचा आरोप हार्दिक पटेल यांनी केलाय.

पाटीदार समाजावर अन्याय होत असेल तर हा सामना होऊ देणार नाही. क्रिकेटपटूंना रस्त्यात रोखण्यात येईल, असा इशारा पटेल यांनी दिला आहे. धमकीच्या यापार्श्वभूमीवर पोलिसांनी स्टेडियम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.