गँगरेप प्रकरण: अन् जया बच्चन संसदेत रडल्या....

दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे संसदेत तीव्र पडसाद उमटलेत. खासदार जया बच्चन यांनाही महिलांच्या स्थितीवर बोलताना अश्रू अनावर झाले.

Updated: Dec 19, 2012, 02:44 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे संसदेत तीव्र पडसाद उमटलेत. खासदार जया बच्चन यांनाही महिलांच्या स्थितीवर बोलताना अश्रू अनावर झाले. त्यांनी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत बोलताना आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी केली आहे.
महिलांच्या सुरक्षेच्या मुद्यावर विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले. विशेष म्हणजे महिलांवरील अत्याच्याराच्या मुद्यावर सर्व महिला खासदार बरसल्या. दिल्लीतल्या बलात्कारातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तसंच केंद्रीय गृहमंत्री आणि पोलीस प्रशासनांनं आतापर्यंत काय कारवाई केली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारनं दिल्लीतल्या सामूहिक बलात्काराची गंभीर दखल घेऊन तातडीनं कठोर कारवाई करावी असे निर्देश लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी सरकारला दिले. त्यावर संसदीय कामकाजमंत्री कमलनाथ यांनी सरकार त्वरीत करावाई करणार असल्याचे आश्वासन दिलं. तर दुसरीकडे राज्यसभेतही सामूहिक बलात्कारावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.