केजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.

Updated: Feb 18, 2015, 08:09 PM IST
केजरीवालांच्या खोकल्यावर मोदींचा डोस title=

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणखी दोन गोष्टींमुळे ओळखले जातात, एक तर मफलर, दुसरा म्हणजे त्यांचा खोकला. अरविंद केजरीवाल यांचा खोकला थांबण्याचं नाव घेत नाही. कधी तो जास्त तर कधी कमी असतो.

आपकी 'खाँसी' मोदीजी का 'इलाज'
दिल्लीचे पोलिस आयुक्त भीमसेन बरसी यांनी मंगळवारी चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल उपस्थित होते, यावेळी त्यांनी काही खासगी गोष्टींवरही चर्चा केली.

चर्चेत नरेंद्र मोदी, अरविंद केजरीवाल, राजनाथ सिंह, मनीष शिसोदीया आणि किरण बेदी ही होत्या, यावेळी अरविंद केजरीवाल यांनी अधून-मधून खोकला येत होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांनी सरळ-सरळ अरविंद केजरीवाल यांना विचारलं, हा खोकला बंद का होत नाही, एवढा खोकला का येतो, असा सवाल मोदींनी केला.

तेव्हा "वातावरण बदलल्यानंतर खोकला कमी जास्त होत राहतो, पण कायमचा जात नाही, मी कंटाळलोय खोकल्याला", असं उत्तर अरविंद केजरीवाल यांनी दिलं. तेव्हा राजनाथ यांनी कधीपासून हा खोकला आहे, तेव्हा आपचे नेते मनीष शिसोदीया यांनी सात-आठ वर्षांपासून मी पाहातोय. कधी कमी होतो, कधी जास्त असतो यांचा खोकला.

यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सल्ला देखिल दिला.  बंगळुरूमध्ये डॉ. नागेंद्र यांना संपर्क करा, ते क्रॉनिक खोकल्याचे एक्स्पर्ट आहेत. मला वाटतं ते तुम्हाला योग्य तो उपचार सांगितलं.  यावर अरविंद केजरीवाल यांनी मान हलवत मोदींना हो म्हटलं. यानंतर किरण बेदी यांनी अरविंद केजरीवाल यांना तब्येतीची काळजी घेण्याचा सल्ला दिला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.