दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल

महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

Updated: Apr 12, 2016, 01:08 PM IST
दरदिवशी १० लाख लीटर पाणी देण्यास तयार - केजरीवाल title=

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात भयाण दुष्काळाची स्थिती पाहता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पाणी देण्याची तयारी दर्शवलीये. तसेच महाराष्ट्रासाठी पाणी वाचवा असे त्यांनी दिल्लीवासियांना अपील केलेय.

तसेच लातूरमध्ये ट्रेनद्वारे पाणी पाठवल्याबद्दल केजरीवालांनी मोदींचे कौतुक केले. तसेच दिल्लीवरुन पाणी द्यायला तयार असल्याचेही पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलेय. 

पाणी पाठवण्याची व्यवस्था केल्यास पुढील दोन महिन्यांसाठी दरदिवसाला १० लाख लीटर पाणी देण्याची आमची तयारी आहे. जर सरकारची तयारी असल्यास आम्ही तात्काळ पाणी देण्यास तयार आहोत, असे केजरीवालांनी म्हटलयं.

तसेच लातूरमध्ये भयंकर दुष्काळ आहे. त्यामुळे महाराष्ट्रासाठी दिल्लीकरांनी पाणी वाचवावे असे आवाहनही त्यांनी केलेय.