एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला

राजधानी दिल्लीमध्ये एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. नवी दिल्लीत भरदिवसा या महिला डॉक्टरवर वर्दळीच्या ठिकाणी अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. 

Updated: Dec 25, 2014, 12:21 PM IST
एकतर्फी प्रेम प्रकरणातून महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला title=

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीमध्ये एका महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ल्याची बळी ठरली. नवी दिल्लीत भरदिवसा या महिला डॉक्टरवर वर्दळीच्या ठिकाणी अॅसिड हल्ला करण्यात आल्याची घटना घडलीय. 

पोलिसांनी या प्रकरणात चार आरोपींची ओळख पटवलीय. त्यापैंकी दोघांना पोलिसांनी अटक केलीय तर अद्यापही दोन आरोपी फरार आहेत. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची वय आहेत २० वर्ष आणि २२ वर्ष... हे दोघेही दिल्लीचे रहिवासी आहेत. 

एकतर्फी प्रेम प्रकरणात महिला डॉक्टरवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. 

मंगळवारी सकाळी ही घटना घडली. दोन अज्ञान बाईकस्वारांनी अचानक समोरून येऊन महिला डॉक्टरच्या अंगावर अॅसिड फेकलं. पश्चिम दिल्लीच्या राजौरी गार्डन भागात ही घटना घडली. ३० वर्षीय महिला डॉक्टर काम करत असलेल्या हॉस्पीटलमध्ये जाण्यासाठी निघाली होती. तेव्हाच अचानक समोरून आलेल्या बाईकस्वारांनी तिच्यासमोर गाडी थांबवली आणि बाईकवर मागे बसलेल्या हल्लेखोरानं तिच्यावर अॅसिड फेकलं आणि दोघांनीही तिथून तात्काळ धूम ठोकली. 

अॅसिड हल्ल्यामुळे विव्हळत असलेल्या या महिलेता तत्काळ ती काम करत असलेल्या हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आलं... त्यानंतर इथून तिला एम्समध्ये हलवण्यात आलं.  

दरम्यान, अॅसिड हल्ल्याची बळी ठरलेल्या महिला डॉक्टरवर हॉस्पीटलमध्ये उपचार सुरु आहेत. बुधवारी, डॉक्टरांनी जाहीर केलेल्या मेडिकल बुलेटीनमध्ये, अॅसिडमुळे या महिलेच्या शरीराच्या उजव्या भागाला आणि डोळ्याला गंभीर इजा झाल्याचं म्हटलंय. या महिलेची स्थिती सध्या स्थिर आहेत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.