अयोध्येत मंदिर नाही, मस्जिदच बनेल - ओवैसी

अयोध्या येथील बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला आज 23 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असउद्दीन ओवैसी यांनी बंदचं आवाहन केलं आहे.

Updated: Dec 6, 2015, 02:06 PM IST
अयोध्येत मंदिर नाही, मस्जिदच बनेल - ओवैसी title=

हैदराबाद : अयोध्या येथील बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला आज 23 वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे एमआयएम या पक्षाचे अध्यक्ष असउद्दीन ओवैसी यांनी बंदचं आवाहन केलं आहे.

'राम मंदिराचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाकडे न्यायप्रविष्ठ असल्यामुळे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहिलेले राममंदिर उभारणीचे स्वप्न पूर्ण होणे अशक्य आहे. मात्र, एक दिवस बाबरी मशीद नक्की होईल,' असं वक्तव्य ओवैसी यांनी केलं आहे.

आज हा घटनेला 23 वर्ष पूर्ण होत असल्याने अयोध्यासह देशात अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीच्या तोंडावर सरसंघचालक मोहन भागवत आणि ओवैसी या दोघांचंही असं वक्तव्य करणं म्हणजे राजकीय पोळी भाजून घेण्याचाच प्रकार आहे अशी राजकीय चर्चा सध्या रंगतेय. त्यामुळे निवडणुकीपर्यंत मतदारांना आकर्षित करण्यासाठी अशी अजून वक्तव्य केली जातील अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.