मुस्लीम बहुल भागात मोदींनी असं काही केलं की कोणी कल्पनाच केली नसेल

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रोड शो केला. 

Updated: Mar 5, 2017, 10:14 AM IST
मुस्लीम बहुल भागात मोदींनी असं काही केलं की कोणी कल्पनाच केली नसेल title=

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या लोकसभा मतदारसंघात रोड शो केला. पंतप्रधान मोदी हे मुस्लीम विरोधी असल्याची टीका अनेकांकडून होतं असते पण बनारसच्या रस्त्यावर रोड शो दरम्यान काही वेगळंच दृष्य पाहायला मिळालं. रोड शो दरम्यान मोदींनी असं काही केलं ज्याचा कोणी विचार ही केला नसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रोड शो मुस्ल‍ीम भागातून जात असतांना मदनपुरामध्ये ३० मिनिटांसाठी थांबला. येथे पंतप्रधान मोदींनी एसपीजीच्या सुरक्षा रक्षकांना सांगून बावनीचे सरदार हाजी मुख्तार अहमद महतो यांनी दिलेला पुष्पगुच्छ आणि शाल स्विकारली. पूर्व भागातील जिल्ह्यांच्या ५१ सरदारांच्या प्रमुखाला बावनी सरदार म्हणतात.

महत्त्वाचं म्हणजे ती शाल पंतप्रधान मोदींनी डोक्यावर ठेवली. ऐवढंच नाही तर त्यांनी हे देखील म्हटलं की 'प्रत्येक मुस्लमान माझा भाऊ आहे. देशाच्या विकासासाठी तुम्ही सगळ्यांनी पुढे यावं.'