अण्णांची सोबत मिळाल्यास आंदोलनाची शक्ती वाढेल- केजरीवाल

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जर आपल्यासोबत आले तर आपल्या आंदोलनाची शक्ती वाढेल, असं आम आदमी पार्टी (आप)चे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 6, 2013, 10:56 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे जर आपल्यासोबत आले तर आपल्या आंदोलनाची शक्ती वाढेल, असं आम आदमी पार्टी (आप)चे अरविंद केजरीवाल यांनी म्हटलंय.
एका वृत्तवाहिनीसोबत बोलतांना केजरीवाल म्हणाले, “मला अण्णांची कमतरता नेहमी भासते”. मागील वर्षी लोकपाल विधेयकाबाबतचं आंदोलनसाठी अण्णा आणि केजरीवाल एकत्र होते. मात्र अरविंद केजरीवाल यांनी राजकीय क्षेत्रात प्रवेश केल्यामुळं अण्णा आणि ते वेगळे झाले. अण्णा हजारेंनी आपल्या ७५व्या वाढदिवशी म्हटलं होतं की ते केजरीवाल यांच्या विरुद्ध नाहीयेत. कारण केजरीवाल हे एक चांगले व्यक्ती आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी राजकीय क्षेत्र निवडल्यामुळं माझं त्यांना समर्थन नाही, असंही अण्णांनी स्पष्ट केलं होतं. निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टीला आपण पाठिंबा देणार नसल्याचंही अण्णा म्हणाले होते. मात्र केजरीवाल यांना अण्णांच्या सोबतीची अपेक्षा दिसतेय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.