आता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार

येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय.  या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 9, 2017, 07:11 PM IST
आता रेल्वे स्टेशनवर एटीएमची सेवा मिळणार title=

नवी दिल्ली : आता रेल्वे प्लॅटफॉर्मवर तुम्हाला एटीएम दिसून येतील, यामुळे रेल्वेच्या प्रवाशांना फ्लॅटफॉर्मवर कॅश काढता येणार आहे. रेल्वेच्या महसूलात वाढ करण्याच्या हेतूनं आता स्टेशनवरची जागा एटीएम मशीनसाठी देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या विचाराधीन आहे.  

येत्या अर्थसंकल्पात या प्रस्तावाला मान्यता मिळण्याची शक्यताय.  या मार्गानं रेल्वेला 2 हजार कोटींचा महसूल मिळेल अशी आशा आहे. 

इंटरनेटच्या माध्यमातून रेल्वे स्टेशनवरच्या जागांचे लिलाव करण्यात येतील. त्यामुळे व्यवहार पारर्दशक असेल. लिलावानंतर मिळणाऱ्या जागेवर कंत्राटदाराला 10 वर्ष एटीएम मशीन लावता येईल.