मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

Updated: Nov 23, 2015, 03:59 PM IST
मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप title=

थिरुअनंतपुरम : महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

मंदिर प्रशासन प्रमुखांच्या या विधानाविरोधात लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे आणि फेसबुकवर #HappyToBleed कॅम्पेन सुरु केलं आहे.

21 व्या शतकातही महिलांबद्दलच्या बुरसटलेल्या विचारांविरोधात महिलांनी कंबर कसली आहे. फेसबुकवर ‘हॅप्पी टू ब्लीड’ या नावाने सुरु असलेल्या कॅम्पेनमध्ये प्रत्येक वयोगटातील तरुण-तरुणींनी सहभाग नोंदवला आहे आणि मंदिर प्रशासनाच्या वक्तव्याचा जोरदार विरोध केला आहे. समाजात महिलांच्या मासिक पाळीबाबत पसरलेली अंधश्रद्धा आणि भ्रम आणखीच मजबूत झाला आहे, असं मत नेटीझन्स फेसबुकवर मांडत आहेत.

अशा मानसिकतेचा विरोध करण्यासाठी तरुणींनी हातात सॅनिटरी नॅपकिन आणि पोस्टर घेऊन फोटो पोस्ट करावा आणि #HappyToBleed कॅम्पेनमध्ये सहभागी व्हा, असं आवाहन या मोहीमेत करण्यात आला आहे.

सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांच्या वक्तव्यानंतर निकीता आझाद नावाच्या एका मुलीने त्यांना खुलं पत्र लिहिलं, जे व्हायरल झालं आहे आणि शनिवारी त्याला एका मोहीमेचं स्वरुप आलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.