पेट्रोल स्वस्त तर डिझेल महाग

पेट्रोलच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, त्याचबरोबर डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दराबाबत १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे.

Updated: Mar 14, 2013, 01:13 PM IST

www.24taas.com,नवी दिल्ली
पेट्रोलच्या किमतीत घट होणार आहे. मात्र, त्याचबरोबर डिझेलच्या किमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दराबाबत १५ मार्चच्या मध्यरात्रीपासून अमलात येण्याची शक्यता आहे.
पेट्रोलच्या एक लिटरमागे एक रूपयांनी घट करण्यात आलीय. तर डिझेलच्या दरात लिटरमागे ४० ते ५० पैशांनी वाढ करण्यात येणार आहे. दर दरवाढ १५मार्चच्या रात्रीपासून लागू होईल, अशी शक्यता व्यक्त केली गेलीय.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्चा तेलाच्या किमतीत घट झाल्याने पेट्रोलच्या दरात घट करण्यात आलीय. तर डिझेलचा दर महिन्याला ११ रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे डिझेलच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.