स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट

तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे.

Updated: Jul 4, 2016, 10:12 AM IST
स्मार्टफोन नसला तरी मोबाईलवर मिळणार रेल्वे तिकीट  title=

मुंबई : तुमच्याकडे स्मार्टफोन नसला, तरी आता साध्या मोबाईलवरही रेल्वेचं तिकीट मिळणं लवकरच शक्य होणार आहे. रेल्वे इन्फर्मेशन सेंटर त्यासाठी प्रयत्न करतंय. सध्या फक्त ऍन्ड्रोईड ऑपरेटिंग सिस्टीम असणा-यांच्याच फोनमध्ये मोबाईलवर रेल्वे तिकीट मिळतं, पण आता साध्या मोबाईलवर तिकीट मिळण्यासाठी विविध चाचण्या सुरू आहेत.

येत्या दोन महिन्यांत ही सेवा सुरू होण्याची शक्यता आहे. यासाठी मोबाईलवर आलेला कोड एटीव्हीएम मशीनला दाखवून त्यामधून प्रिंटआऊट घ्यावी लागणार आहे.