भाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत

आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.

PTI | Updated: Mar 22, 2015, 06:51 PM IST
भाजप आमदारपुत्रानं दिली शिपाई होण्यासाठी मुलाखत title=

जयपूर : आपल्या मुलांनी आपल्याच पावलावर पाऊल ठेवत राजकीय क्षेत्रात पदार्पण करावं, राजकारण गाजवावं अशी बहुतांश राजकारण्यांची मनीषा असते. परंतु राजस्थानातील भारतीय जनता पक्षाच्या एका आमदाराची मात्र अशी काही इच्छा दिसत नाही. म्हणूनच त्यांच्या मुलानं शुक्रवारी अजमेरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी कर्मचारी पदासाठी (शिपाई) मुलाखत दिली.

राजस्थानच्या टोंक जिल्ह्णातील निवाई विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार हिरालाल वर्मा यांचा मुलगा हंसराज केवळ इयत्ता आठवीपर्यंतच शिकू शकला. त्यामुळे त्याच्यावर ही वेळ आली. खुद्द आमदारांनी याबाबत बोलताना सांगितलं की, मी स्वत: तीन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षणातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सुवर्णपदकही पटकाविलं आहे. परंतु दुर्दैवानं मुलगा मात्र शिक्षणात मागे पडला. 

मी समाजकल्याण विभागात उपसंचालक होतो. सरकारी नोकरी मिळाल्यानंच त्याचं भविष्य सुरक्षित राहील याची मला संपूर्ण कल्पना आहे. तो शिकू शकला नाही. त्यामुळं अशाचप्रकारच्या नोकरीची त्याची क्षमता राहिली आहे. अजमेर कृषी उत्पन्न बाजार समितीत चतुर्थ श्रेणी पदांच्या भर्तीसाठी जाहिरात निघाली होती. मुलाने अर्ज केला आणि त्याला शुक्रवारी मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं होतं. कुठल्याही व्यक्तीनं आपल्या क्षमतेनुसार काम केलं पाहिजे आणि मुलगा कमी शिकला असल्यानं तो अशाचप्रकारची नोकरी करू शकतो, असं हिरालाल वर्मा यांचं मत आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.