राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार

राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

Updated: Mar 13, 2017, 02:41 PM IST
राजनाथ सिंह केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार title=

नवी दिल्ली : राजनाथ सिंह मुख्यमंत्री म्हणून उत्तर प्रदेशमध्ये जाणार नाहीत. विश्वसनीय सूत्रांनी झी मीडियाला ही माहिती दिलीय. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी कोणाला विराजमान करायचं याची चाचपणी सध्या सुरु आहे.

दिल्लीत भाजप संसदीय बोर्डानं 2 पर्यवेक्षकांची नियुक्तीही केली गेली. दरम्यान उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जाताहेत. त्यात इतरांबरोबच राजनाथ सिंह यांचंही नाव आघाडीवर आहे. त्यामुळे चर्चेला उधाण आलं होतं. मात्र राजनाथ सिंह हे केंद्रीय गृहमंत्री म्हणूनच कामकाज पाहणार असल्याचं, विश्वसनीय सूत्रांकडून झी मीडियाला सांगण्यात आलं आहे.