उत्तर प्रदेशातील 'मर्दानी'!

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला. 

Updated: Sep 9, 2014, 09:09 AM IST
उत्तर प्रदेशातील 'मर्दानी'! title=

बाराबंकी: उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये अल्पवयीन मुलीनं घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला जखमी केलं. काठीनं मारल्यानंतर छातीत चाकू भोसकला. 

ही घटना घडलीय बाराबंकीच्या जहांगीराबाद परिसरात. अल्पवयीन मुलीनं जखमी केलेल्या तरुणावर आरोप आहे की, त्यानं मुलीच्या घरात शिरून बलात्काराचा प्रयत्न केला. 

मुलीच्या तक्रारीवर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपीला लखनऊच्या मेडिकल कॉलेजमध्ये भर्ती केलं गेलंय.  

आरोपीवर हल्ला करणाऱ्या मुलीला पोलिसांनी चौकशीनंतर सोडून दिलं. मात्र गावातील दबंग मुलांनी मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना धमकावत गावातून हाकलवून दिलंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.