५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत

राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे. 

Updated: Apr 11, 2017, 07:54 PM IST
५ वर्षात सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत  title=

नवी दिल्ली : राज्यसभेचे खासदार सचिन तेंडुलकर आणि रेखा यांच्यावर राज्यसभेतल्या उपस्थितीवरून जोरदार टीका होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये सचिन २३ तर रेखा १८ वेळा संसदेत उपस्थिती लावली आहे.

मागच्या पाच वर्षांमध्ये झालेल्या अधिवेशनांच्या ३४८ दिवसांपैकीची ही हजेरी आहे. २०१२ साली सचिन आणि रेखासह १२ सदस्यांची राष्ट्रपतीनियुक्त खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

मागच्या पाच वर्षांमध्ये सचिन आणि रेखावर प्रत्येकी ५८ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. यामध्ये प्रत्येक महिन्याला ५० हजार रुपयांचं वेतन, मतदारसंघामध्ये खर्चासाठी महिन्याला ४५ हजार रुपये, १५ हजार रुपयांचा कार्यालयीन भत्ता, प्रवास आणि रोजचा भत्ताही दिला जातो.